Ad will apear here
Next
हिमायतनगरमध्ये अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचा आमदारांचा सल्ला


हिमायतनगर :
‘हिमायतनगर मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी काम करावे. नवे-जुने असा भेद न करता सर्वांनी एकजुटीने कार्य करावे,’ असे आवाहन हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले.



आमदार पाटील यांनी १० ऑक्टोबर २०१८ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर हिमायतनगर शहरात विविध ठिकाणी एक कोटी तीन लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. या वेळी हिमायतनगर शहरातील काँग्रेसचे सुनील चव्हाण व युवा मोर्चाचे अनिल नाईल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 



या वेळी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपनगराध्यक्ष मो. जावेद भैया, मुख्याधिकारी नितीन बागुल, रामभाऊ ठाकरे, अन्वर खान पठाण, सदाशिव सातव, प्रभाकर अण्णा मुधोळकर, जनसेवक सरदार खान पठाण, सावन डाके, विनायक मेंडके, विठ्ठल ठाकरे, जफर लाला, विलास वानखेडे, तालुका संघटक संजय काईतवाड, प्रकाश रामदिनवार, रामू नरवाडे, गजानन पाळजकर, सुनील चव्हाण, अनिल नाईल, बंडूभाऊ अनगुलवार, योगेश चिल्कावार, मंगेश धुमाळे, सालीम भैय्या शेवाळकर, दीपक कात्रे, अमोल धुमाळे, कल्याणसिंग ठाकूर, हिमायतनगर शहरातील सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे कार्यकर्ते, नगर पंचायतीचे कर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते. 



आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर कमानीजवळ नगर पंचायतीने परवानगी दिलेल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या फलकाचे अनावरण केले. पुढे या हायवेवर नगर पंचायतीची परवानगी घेऊन शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZSSBT
Similar Posts
हिमायतनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक तरुणांनी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात आठ जुलै २०१९ रोजी झाला.
हिमायतनगरमध्ये नूतन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदन हिमायतनगर (नांदेड) : शहरातील नगरपंचायतीत नूतन नगराध्यक्ष कुणाल राम राठोड आणि मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०१८ रोजी ध्वजवंदन झाले. आधी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून, नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात झाला.
हेमंत पाटील यांच्या विजयानंतर हिमायतनगरात जल्लोष हिमायतनगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा दोन लाख ७५ हजार १०३ मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर हिमायतनगर शहरात व तालुक्यातील गावागावांत शिवसेना व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून, शहरात भव्य रॅली काढून, लोकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचा प्रचार वेगात हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language